भाड्याच्या घरात राहात होते बिग बी; शेअर केल्या आठवणी

0

तो १९५०चा काळ होता. त्यावेळी आम्ही अलाहाबादमधील भाड्याच्या घरातील पाव भागात राहात होतो. १७ क्लाईव्ह रोड येथे ते घर होते.

पुढे १९८४ मध्ये (अभिनेता म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असताना) मी पुन्हा तेथे गेलो. त्याच्या आठवणी आपल्यासोबत वाटून घेतोय. बॉलीबूडचे बादशहा बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन यांनी ही आठवण इन्टाग्रामवर शेअर केलीय.

श्री. बच्चन यांचे वडिल सुप्रसिद्ध कवि साहित्यिक हरिवंशराय बच्चन होते. ते अलाहाबादमध्ये राहत होते. सुरवातीच्या काळात अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.

पुढे जंजीर चित्रपटाने त्यांना अँग्री यंगमॅन म्हणून ओळख दिली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

आपल्या आठवणींमध्ये बिग बींनी अभिषेकच्या लहानपणचे फोटोही शेअर केले आहेत. त्यात अगदी जन्माला आला तेव्हा काचेच्या पेटीत ठेवलेला अभिषेक आणि आता सव्वासहा फूट उंच झालेला अभिषेक असा उल्लेखही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

*