बॉलिवूडचे बिग बी झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात

0
मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी दक्षिणेकडील चित्रपटांकडे मोर्चा वळवला आहे. अमिताभ लवकरच सुपरस्टार चिरंजीवी यांच्यासोबत एका तेलुगु चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटामधील अमिताभ यांचा पहिला लुक सध्या व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमध्ये शेहनशहचे पद सांभाळणारे अमिताभ बच्चन यांचा कसदार अभिनय आज अनेक चित्रपटात बघायला मिळतो. आता अमिताभ यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडच्या चित्रपटांकडे वळवला आहे. अमिताभ सध्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतात त्यावरून असे दिसून येते की त्यांचा काळ अजून संपला नाही आहे. पुढचे १० ते १५ वर्ष तरी ते असेच चित्रपट करत राहतील. आता लवकरच अमिताभ बच्चन साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी बरोबर तेलगू चित्रपटात दिसणार आहे.

हा त्यांचा पहिला चित्रपट असेल ह्या चित्रपटाचे चित्रीकरण करताना अमिताभ बच्चन नुकतेच हैदराबादमध्ये दिसले. हा चित्रपट स्वत्रंतता सेनानी नारसिंम्हा रेड्डी ह्याच्या जीवनावरवर आधारित आहे. या चित्रपटाचे नाव ‘सई रा नारसिम्हा रेड्डी’ असे आहे.

यावेळी आपल्या भूमिकेविषयी माहिती देताना बिग बी म्हणाले कि, प्रिय चिरंजीवी मी तुझ्या विनंतीला मान देऊन पाहुणे कलाकाराची भूमिका करण्यासाठी हैद्राबादला येतो आहे, मी इतिहासातील सर्वात शूर व्यक्तीची भूमिका करणार आहे” ह्या चित्रपटातील अमिताभ यांनी आपला लूक सुद्धा शेअर केला आहे त्यात अमिताभ लांब दाढी मध्ये दिसत आहे.

LEAVE A REPLY

*