महानायकाचा आज 75 वा वाढदिवस असा आहे जीवनप्रवास

0

डिजिटल विशेष : 

बॉलीवूडमध्ये आजवर अनेक सुपरस्टार होऊन गेलेत किंवा आहेत. मात्र महानायक अमिताभ बच्चन हे सुपरस्टार आहेत आणि असतील. आज ही हिंदी चित्रपट सृष्टीत इतर कलाकारांना त्यांच्या अभिनयाची उंची गाठता आली नाहीये.

गेल्या चार दशकांपासून अधिक काळ दोनशे सिनेमात बिग ‘बी’ नी अभिनयाची मोहर उमटवली आहे.

अमिताभ बच्चन म्हटलं की, शहेनशहा, महानायक, अँग्री यंग मॅन,  बिग बी अशी अनेक विशेषणे आठवतात. अभिनयासोबतच पार्श्वगायक, चित्रपटनिर्मिती यांत महानायक कुठेही कमी नाही. असा हा महानायक आज वयाची 75 वी पूर्ण करतोय.

त्यानिमित्याने त्यांच्या जीवन प्रवास-

अलाहाबादमध्ये 11 ऑक्टोबर 1942 रोजी महानायकाचा जन्म झाला. प्रख्यात कवी हरिवंशराय बच्चन हे त्यांचेच वडील.  के. ए. अब्बास दिग्दर्शित सात हिन्दुस्तानी (1969) हा अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट. पण जंजीर या चित्रपटाने अँग्री यंग मॅन घरा-घरात पोहचला आणि सुरु झाला महानायकाचा प्रवास.

त्यांचा अभिनय क्षेत्रातील कार्याला भारत सरकारने  पद्मश्री(1984), पद्मभूषण(2001), पद्मविभूषण(2015)

तसेच, सिनेविश्वातील अमूल्य योगदानाबद्दल फ्रान्सचा ‘नाईट ऑफ लेजिअन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.

 

LEAVE A REPLY

*