Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

मुंबईतील मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड झाली

Share

मुंबई :

मनसेच्या महाअधिवेशनात अखेर आज मोठी घोषणा झाली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. सर्व मनसैनिकांच्या संमतीनं अमित ठाकरे यांच्या नावाचा ठराव पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी मांडला. त्यानंतर त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

मनसेच्या महाअधिवेशनात अखेर अमित ठाकरे यांचं लाँचिंग झालं. अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड केल्याची घोषणा पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर अमित यांचे शाल आणि तलवार देऊन स्वागत केलं. अमित ठाकरे यांना संपूर्ण ठाकरे कुटुंबाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

पक्षाच्या नेतेपदी अमित यांच्या नावाची घोषणा होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मुलाची म्हणजेच अमित यांची मोबाइल कॅमेऱ्यात छबी टिपली. यावेळी त्यांच्यासह अमित यांची पत्नी मिताली आणि बहीण उर्वशी या देखील भावूक झाल्या होत्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!