Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांनी सरकार स्थापन करावे – अमित शाह

Share

शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला

नवी दिल्ली- महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भाजपचे केंद्रीय नेते बरेच दिवस मौन बाळगून होते. आज प्रथमच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगावर भाष्य केले आहे. शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी आम्हाला मान्य नाही. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार स्थापन करावे, असे म्हणत शिवसेनेला आव्हान दिले. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली असा आरोप अमित शाह यांनी केला आहे.

शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असे काहीही ठरलेले नव्हते असंही अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झालं होतं असंही त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर अमित शाह यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे.

शहा यांनी राज्यपालांच्या राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाचंही समर्थन केले आहे. ते म्हणाले, यापूर्वी सरकार स्थापन करण्यासाठी एवढा वेळी कोणत्याही राज्यात दिला गेला नव्हता. 18 दिवसांची मुदत दिली होती. राज्यपालांनी सर्व पक्षांना विधानसभेच्या कार्यकाळ संपल्यानंतरच बोलावंलं. शिवसेना, काँग्रेस, एनसीपी आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला. आजही जर कुठल्या पक्षाकडे संख्याबळ असेल तर तो पक्ष राज्यपालांकडे जाऊ शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!