Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अमित शहांच्या सभा रद्द झाल्याने उमेदवार, कार्यकर्ते हिरमुसले

Share

अकोले/कर्जत (तालुका प्रतिनिधी) –  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जिल्ह्यातील अकोले व कर्जत येथील दोनही सभा खराब हवामानामुळे रद्द झाल्या. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांची सभा गाजणार अशी चर्चा होती. मात्र सभा रद्द झाल्याने दोन्हीकडील महायुतीचे उमेदवार व कार्यकर्ते हिरमुसले.

शनिवार दि. 19 रोजी अकोले येथे दुपारी बारा व कर्जत येथे दोन वाजता ही सभा होणार होती. दोन्ही ठिकाणी संयोजकांनी पूर्ण तयारी केली होती. शुक्रवारी रात्रीपासून दोन्ही ठिकाणी पाऊस असल्याने शहा यांची सभा होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र शहा यांचा दौरा निश्चित असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात येत होते. दोन्ही ठिकाणी सभेसाठी मोठी गर्दी जमा झाली होती. शुक्रवारी रात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारपर्यंत टप्प्याटप्प्याने पडतच होता. दोन्ही सभांच्या ठिकाणी पाणी साचले होते. दुपारपर्यंत शहा येणार हे निश्चित असल्याने सभेसाठीच्या मैदानावरील साचलेले पाणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता.

शहा नवापूर येथील सभा आटोपून जिल्ह्यातील सभांना येण्यासाठी निघाले होते. मात्र हवामान खराब झाल्याने त्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हवामान खराब असल्याने त्यांना नाशिकला बराचवेळ थांबावे लागले. नगर जिल्ह्यातील सभा आटोपून ते दुपारी चारच्या विमानाने शिर्डी येथून दिल्लीला रवाना होणार होते. मात्र नाशिकलाच बराच वेळ लागल्याने त्यांनी दोन्हीकडील सभा रद्द करून वातावरण थोडे निवळल्यानतंर त्यांनी शिर्डी गाठले. शिर्डी येथून विमानाने ते दिल्लीकडे रवाना झाले.

कर्जत-जामखेड आणि अकोले या दोनही मतदारसंघात मोठी चुरस आले. या चुरशीमुळे शहा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमुळे कार्यकर्ते उत्साहात होते. मात्र त्या रद्द झाल्याने महायुतीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मात्र हिरमुसले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!