Type to search

हिट-चाट

..तर भारत जिंकला असता : आमिर खान

Share

मुंबई : मँचेस्टर येथे पार पडलेल्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील उपांत्य सामन्याच भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडच्या संघाकडून पराभवाचा स्वीकार करावा लागला. निसटती का असेना, पण भारतीय संघाने या सामन्यात विजयी छाप पाडावी अशीच क्रीडा रसिकांची अपेक्षा होती. पण, ही गणितं चुकली आणि सर्व गडी बाद होत विराटसेना 18 धावांनी किवींच्या संघाकडून पराभूत झाली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेत उतरलेल्या भारतीय संघाचा हा पराभव खरंतर अनेकांनाच निराश करुन गेला. पण, या पराभवाकडे सकारात्मक दृष्टीने पाहात सर्वांनीच या स्पर्धेतील संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीची प्रशंसा केली.

यामध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. हरलो तर काय झालं… असं म्हणत कलाकारांनी संघातील खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवत आतापर्यंतच्या खेळाबद्दल त्यांची प्रशंसा केली. शिवाय त्यांचे आभारही मानले. अभिनेता आमिर खान याने सामन्याच्या पराभवासाठी पावसाला दोष देत एका सर्वसामान्य क्रिकेट रसिकाप्रमाणे आपलं मन मोकळं केलं. ‘काल म्हणजेच मंगळवारच्या दिवशी पाऊस पडला नसला तर आज (बुधवारी) चित्र काही वेगळं असतं…. असो भारतीय संघ चांगला खेळला, आम्हाला तुमचा गर्व वाटतो, असं त्याने ट्विटमध्ये लिहिलं. एका अर्थी पाऊसच आमिरच्या टीकेचा धनी ठरला असं म्हणायला हरकत नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!