Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

अमेरिकेत पालिका कर्मचाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार; १२ ठार, ६ जखमी

Share

नवी दिल्ली : अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे एका सरकारी कर्मचाऱ्याकडून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आला आहे. जखमीमध्ये पोलीस कर्मचारीही असून त्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातल्याने तो थोडक्यात बचावला.

दरम्यान अमेरिकास्थित असलेल्या महापालिकेच्या हा प्रकार घडला. या पालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर गोळीबारात हल्लेखोरचा सुद्धा मृत्यू झाला असून जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मात्र नेमका गोळीबार कोणत्या कारणास्तव करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे. त्याचसोबत व्हर्जिनिया बीचच्या इतिहासातील हा अत्यंत वाईट दिवस असल्याचे महापालिकेचे महापौर बॉब डायर यांनी म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!