Type to search

ब्लॉग सार्वमत

अमेरिका-इराण वादाची झळ भारताला

Share

आण्विक करारामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणावर निर्बंधांची घोषणा केली आहे. बराक ओबामा यांच्या प्रशासनाने इराणशी केलेल्या कराराला रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. इराणशी व्यापारी संबंध ठेवणार्‍या कुठल्याही देशाला अमेरिकेशी व्यवहार करता, येणार नाहीत अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यातच पुन्हा अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने बुधवारी (8 मे) इराणकर नवे प्रतिबंध लावले. यामध्ये लोखंड, स्टील, ऍल्युमिनियम आणि तांब्याच्या निर्यातीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

अमेरिकेच्या या प्रतिबंधांनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद चिघळला आहे आणि अमेरिकेने करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत इराणवर आर्थिक प्रतिबंध लागू करण्याचे ठरवले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत भारताने आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे आणि आपण या प्रकारच्या जोरजबरदस्तीच्या विरोधात असल्याचे भारताने अमेरिकेला कळवले आहे. मात्र अमेरिकेच्या इराणवरील या निर्बंधांचे परिणाम भारतावरही होणार आहेत. इराक आणि सौदी अरेबिया यांच्यानंतर भारताला तेल पुरवणारा इराण सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी जुलैमध्ये इराणकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
अमेरिकेच्या इराणवरील प्रतिबंध नोव्हेंबर महिन्यापासून आणखी कठोर होणार आहेत. त्यावेळी भारताची तेल खरेदी कमी होईल. भारताच्या विरोधाचे कारण अगदी स्पष्ट आहे. भारताच्या कच्च्या तेलाची गरज पूर्ण करणारा इराण हा एक महत्त्वाचा देश आहे सौदी अरब आणि इराक यांच्यानंतर इराणकडूनच आपण मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करतो. जर इराणवर आर्थिक प्रतिबंध लागू झाले, तर भारताला इराणकडून कच्च्या तेलाचा पुरवठा होण्यात अडचणी येतील. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि त्याचा विपरीत परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, हा एक भाग झाला.

दुसरा प्रश्न आहे चाबहार बंदराबाबतचा. भारत इराणमधील चाबहार बंदराचे काम करत आहे त्याचा पहिला बर्थ तयार झाला आहे. आणि त्याचे संचलन भारतीय कंपनीकडे देण्यात आले आहे. चाबहारचे राजकीय महत्त्वदेखील मोठे आहे. चाबहार बंदरामुळे मध्य एशियातील अनेक देशांन आपली उत्पादने पाठवू शकेल. परंतु अमेरिका इराण वादाने चाबहार बंदरासाठी निधी जमा करताना भारताला अडचण येऊ शकणार आहे. दोघांच्या भांडणात तिसर्‍याची हानी! होणार आहे.

– धनंजय शिंदे
9975734551

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!