Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशअमेरिकेने मागितली भारताकडे मदत

अमेरिकेने मागितली भारताकडे मदत

सार्वमत

नवी दिल्ली –  सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. इटली, स्पेन, अमेरिका, चीन यासारखे आर्थिक विकसीत देशही या विषाणूमुळे हैराण झाले आहेत. अमेरिकेत प्रत्येक दिवशी कोरोना विषाणूमुळे मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेची मदार आता भारतावर असणार आहे. शनिवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत कोरोनाविरुद्ध लढ्यात मदतीची विनंती केली आहे. अमेरिकेत सध्या 3 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालेली असून आतापर्यंत 8 हजारपेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

- Advertisement -

कोरोनामुळे जिवीतहानी झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका सध्या तिसर्‍या स्थानावर आहे. न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्येही नागरिकांना या विषाणूचा फटका बसला आहे. लोकांमध्ये भीती निर्माण होऊ नये याकरता प्रशासन रात्रीच्या वेळी मृतदेह बाहेर काढत आहे. भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध प्रभावी ठरलं होतं. भारतात आजही अनेक लोकांना मलेरिया हा आजर होत असतो, यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात या औषधाचं उत्पादन करत असतात. हेच औषध सध्याच्या घडीला कोरोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे, हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या मागणीत वाढ झालेली आहे. हे औषध अमेरिकेलाही उपलब्ध व्हावं यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. मात्र कच्च्या मालाच्या अभावापोटी भारतातही या औषधाचं उत्पादन कमी झालेलं आहे. सध्या जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे भारतातील औषध कंपन्यांनी या औषधासाठीचा कच्चा मालक एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.

ब्राझील पुरवणार कच्चा माल – डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांच्याशी बातचीत केली. यावेळी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्मितीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही असं आश्वासक बोलसोनारो यांनी दिलं. हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्मितीसाठी भारत चीन आणि ब्राझील या दोन देशांकडून बहुतांश कच्चा माल आयात करतो. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सध्या जगभरातील वैद्यकीय यंत्रणा कसोशीने काम करत आहेत, त्यामुळे या लढ्याला कधी यश येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या