अमेरिकन संसदेत H-1B धारकांसाठी विधेयक

0

अमेरिका : अमेरिकन संसदेत भारतीय वंशाचे सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांनी एक विधेयक सादर केले आहे. हे विधेयक संमत झाल्यास एच-१ बी व्हिसाधारकांना नोकरी बदलण्याची सवलत मिळू शकणार आहे. हा व्हिसा अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्यांना मिळतो. या व्हिसाची वार्षिक मर्यादा २० हजार पर्यंत मर्यादित न ठेवता त्यात वाढ करण्याची मागणी कृष्णमूर्ती यांनी या विधेयकाद्वारे केली आहे.

हे विधेयक संमत झाल्यास ग्रीन कार्डाच्या प्रलंबित अर्जांपासूनही दिलासा मिळणार आहे. कृष्णमूर्ती यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात हे इमीग्रेशन इनोव्हेशन अॅक्ट, २०१८ सादर केले. रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर माइक कॉपमन यांनी कृष्णमूर्तींना समर्थन दिले. हे विधेयक मंजूर झाल्यास एच-१बी वर्क व्हिसा कार्यक्रमात सुधारणा होऊन ती प्रक्रिया अधिक सोपी होईल.

LEAVE A REPLY

*