पत्नीला मारण्यासाठी घरावर त्याने चक्क विमान आदळवले

0

वॉशिंग्टन : पत्नीशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या उटा शहरातील डूयन यूड नावाच्या एका व्यक्तीने स्वतःच्याच घरावर विमान क्रॅश केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत यूडचा मृ्त्यू झाला असून त्याची पत्नी आणि मुलगा या दुर्घटनेतून बचावले आहेत.

मिडियानुसार या घटनेच्या काही तासांपूर्वीच पत्नीशी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात यूडने पत्नीला मारहाण केली होती. याप्रकरणी यूड याला कौटुंबिक हिंसेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. यूड याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा आरोप होता. या घटनेचा राग मनात ठेवून पत्नीला ठार मारण्यासाठीच त्याने स्वतःच्या घरावर विमान क्रॅश केल्याची माहिती आहे. पोलिसांनी सांगितले की, यूड ज्या कंपनीत काम करत होता, त्याच कंपनीचे हे विमान होते.

 

LEAVE A REPLY

*