Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘सानुग्रहा’साठी महापालिकेत काम बंद

Share

महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – दिवाळी तोंडावर आली तरी अजूनही सानुग्रह अनुदान मिळाले नाही. ते मिळावे या मागणीसाठी काम बंद करत कर्मचार्‍यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या दिला.

दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान मिळावे या करीता कर्मचारी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची दखल घेत सानुग्रह अनुदानाचा विषय महासभेत घेण्यात आला. महासभेने प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. तसा ठराव करून तो प्रशासनाकडे पाठविला. मात्र प्रशासनाने अजूनही कर्मचार्‍यांना हे सानुग्रह अनुदान दिले नाही. दिवाळी तोंडावर आली तरीही अनुदान मिळत नसल्याने कर्मचारी चिडले. एकीने काम बंद करत त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. दुपारपर्यंत हे आंदोलन सुरू होते.

आयुक्त म्हणाले, बाहेर जा..
कर्मचारी सानुग्रह अनुदानासाठी थेट आयुक्तांच्या दालनात घुसले. तेथेच ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी कर्मचार्‍यांना बाहेर जाण्याचे सांगितले. काम अटोपल्यानंतर दोन प्रतिनिधींसमवेत चर्चा करू असे सांगत आंदोलक कर्मचार्‍यांना दालनाबाहेर काढले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!