Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

महापालिका देणार परत एक कोटीची बँक गॅरंटी

Share
थकीत करधारकांची नावे झळकली फ्लेक्सवर, Latest News Taxpayer Name Flex Amc Action Ahmednagar

एनजीटीची ऑर्डर । डिसेंबरपर्यंत बायोमिथेन प्रकल्प पूर्ण करणार

अहमदनगर (प्रतिनिधी) – वारंवार मुदतवाढ देऊनही महापालिका प्रकल्प सुरू करण्यात अपयशी ठरत असल्याने हरित लवादाने (एनजीटी) दुसर्‍यांदा एक कोटीची बँक गॅरंटी महापालिकेकडे मागितली आहे. पाच डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत बायोमिथेन प्रकल्प सुरू होईल असे प्रतिज्ञापत्र महापालिका देणार असल्याचे समजते.

बुरूडगाव रस्त्यावरील कचरा प्रकल्पामुळे प्रदुषणाच्या तक्रारी एनजीटीकढे झाल्या. त्याची याचिकाही राधाकिसन कुलट व अन्य शेतकर्‍यांनी एनजीटीकडे दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे.

मार्च 2019 मध्ये महापालिकेने एनजीटीला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात बायोमिथेन आणि खत प्रकल्प ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे म्हटले होते. मात्र दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागली. त्यामुळे टेंडर आणि वर्क ऑर्डरला विलंब लागला. सप्टेंबरमध्ये वर्क ऑर्डर दिली असून त्यात चार महिन्याचा अवधी ठेकेदाराला दिला आहे. खत प्रकल्पाचे काम मोठे असल्याने तो वेळेत पूर्ण होईल असे दिसत नसले तरी बायोमिथेन प्रकल्प मात्र वेळेत पूर्ण होईल असे प्रतिज्ञापत्र महापालिका देणार असल्याचे समजते. एनजीटीकडे सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान महापालिकेने यापूर्वी एकदा एक कोटी रुपयांची परफॉर्मन्स बँक गॅरंटी दिली होती. आता कोर्टाने हे काम विहित वेळेत पूर्ण करण्याकरीता पुन्हा एक कोटी रुपयांची बँक गॅरंटी मागितली आहे. 5 डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे.

आयुक्तांना कारणे दाखवा
लवादाने आयुक्तांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. एक कोटी रुपये आयुक्तांकडून वसुल का करण्यात येवू नये? असा थेट सवाल आयुक्तांना काढण्यात येणार्‍या नोटीसमध्ये करण्याचे आदेशात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!