Friday, May 3, 2024
Homeनाशिकरुग्णवाहिकेसाठी दोन तासाला ५०० रुपये

रुग्णवाहिकेसाठी दोन तासाला ५०० रुपये

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना साथीच्या काळात रुग्णवाहिकांसाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. तसेच रुग्णवाहिकांचे भाडेदर ठरवून ते परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यातबाबतचे आदेश उच्च न्यायालयाने परिवहन विभागाला दिले होते. त्यानुसार नाशिक कार्यक्षेत्रात नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रुग्णवाहिकांचे भाडेदर निश्चित केले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील रुग्णवाहिकांसाठी वाहन प्रकारानुसार भाडे निश्चित केले असून, यापुढे अवातानुकुलितसाठी दोन तासाला किंवा २५ किमीसाठी ५०० रुपये दर असेल. हे दर ठरविताना दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यामध्ये २५ किलोमीटर अथवा दोन तासांसाठी निश्चित शुल्क करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली.

व्हॅन स्वरूपातील रुग्णवाहिकेसाठी दोन तासाला ५०० रुपये आणि प्रति किलोमीटर ११ रुपये दर आकारण्यात येणार आहे. व्हॅनहून मोठ्या रुग्णवाहिकेसाठी म्हणजेच टाटा सुमो व जीपसदृश्य रुग्णवाहिकेसाठी ६०० रुपये आणि प्रति किलोमीटरला १२ रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

तसेच, मिनी बस म्हणजेच टाटा ४०७ व स्वराज माझदा या रुग्णवाहिकांसाठी ८०० रुपये आणि प्रति किलोमीटर १३ रुपये दर ठरविण्यात आला आहे. ही नियमावली नाशिक जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने रुग्णवाहिकांचे भाडेदर ठरवून ते परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यातबाबतचे आदेश परिवहन विभागाला दिले. त्यानुसार सद्यस्थितीत नाशिक कार्यक्षेत्रात लागू असलेले दर हे किलोमीटर आणि तासाकरिता ठरविण्यात आले आहेत.

– भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या