Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

अंबाती रायडूची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Share

मुंबई : भारतीय संघातील तडाखेबाज फलंदाज अंबाती रायुडू यांनी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान विश्वचषकाच्या निवडीवरून हा निर्णय घेतला असल्याचे सूत्राकडून लक्षात येत आहे.

परंतु याबाबत आंबटी रायडू याने कोणताही खुलासा केलेला नाही. यंदाच्या भारतीय संघात अंबाती रायडू ऐवजी विजय शंकर याची विश्वकपसाठी निवड करण्यात आली आहे, असे प्रेक्षकाचे म्हणणे आहे.

दरम्यान, ऑलराउंडर विजय शंकरच्या दुखापती नंतर त्याच्या जागी मयंक अगरवाल ची निवड झाल्याबद्दल रायुडूला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार रायडू निवृत्ती नंतर ही आयपीएल मध्ये खेळणार आहे.

आंबटी रायडूने आपल्या करियरमध्ये भारतासाठी ५० वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४७.०५ च्या सरासरीने १६९४ धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि १० अर्धशतक शामिल आहेत. दुसरीकडे, रायुडूने पाच टी-२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहेत. त्यात त्याने १०.५० च्या सरासरीने ४२ धावा केल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!