अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवर दररोज राहणार लक्ष; हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात

0

नवी दिल्ली, ता. ११ : अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेवर पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल स्वत: लक्ष ठेवणार आहेत. या यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचा दररोज आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची आपत्कालिन बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय झाला.

हल्ला झाला तरी अमरनाथ यात्रा रहित केली जाणार नसल्याचे केंद्राच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

काल रात्री अमरनाथ यात्रेकरूंवर जम्मू आणि कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामागे लष्कर ए तैय्यबाचा हात असल्याचे तपासातून पुढे येत आहे.

या हल्ल्याच्या एकच दिवस आधी मुझफ्फरनगर येथून पोलिसांनी लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या एकाला अटक केली होती.

या हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू इस्माईल असल्याचे पुढे येत आहे. अतिरेक्यांनी आधी सुरक्षादलावर खन्नाबल येथे हल्ला केला, त्यानंतर पळून जात असताना बसमधील यात्रेकरूंवर त्यांनी गोळ्या चालविल्या.

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मिर राष्ट्रीय महामार्ग आणि उधमपूर येथील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*