अमरनाथ दहशतवादी हल्ला : तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करणा-या तीन दहशतवाद्यांचा दक्षिण काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी खात्मा केला आहे.

अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते.

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यावर बसिर, अबु फुरकान आणि अबु माविया अशी दहशतवाद्यांची नावे आहेत.

यावर बसिर हा कुलगाममधील असून फेब्रुवारी महिन्यात तो लष्कर-ए-तोयबात भर्ती झाला होता. त्याने एका पोलिसाकडून शस्त्र चोरले होते.

LEAVE A REPLY

*