आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : नाशिकवर रायगडची 16 धावांनी मात

0
नाशिक । महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पधार्ंमध्ये रायगडने नाशिक वर 16 धावांनी विजय नोंदवला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या वतीने घेण्यात येणार्‍या अमंत्रितांची क्रिकेट स्पार्धो शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान व महात्मानगर मैदानावर सुरू आहेत. आज झालेल्या सुपरलीग मध्ये अक्षय दरेकर च्या अष्टपैलू खेळामुळे रायगड संघाने नाशिक संघावर 16 धावांनी विजय मिळवला.

काल झालेल्या पावसामुळे आज मैदान ओले असल्याने सामना उशिरा सुरू झाला. 50 षटकाचा सामना सामना पंचांनी 20 षटकाचा होईल असे जाहीर केले. अनंत कान्हरे मैदानावर रायगड संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 6 बाद 131 धावा केल्या, रायगडच्या सलामी फलंदाज ओंकार सुभाष 46 व प्रणव भिसे 28 यांनी 10 षटकात 69 धावाची सलामी दिली.

त्यानंतर आलेल्या भारत अ संघाचे प्रतिनिधित्व केलेला अक्षय दरेकर याने 14 चेंडूत 24 धावा करत धावसंख्या वाढविली. समाधान पांगारे ने 2 तर रणजी पटू सत्यजित बच्छाव व गौरव काळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
उत्तरादाखल नाशिक संघ 20 षटकात 9 बाद 115 धावा करू शकला.

रायगडच्या अक्षय दरेकरने ने 4 गडी बाद करत उत्कृष्ठ गोलंदाजी केली. नाशिक संघाचा कर्णधार रणजीपटू मुर्तुझा ट्रंकवाला ने 20 तर कुणाल कोठावदे ने 38 धावा केल्या.

उद्या अनंत कान्हेरे मैदानावर रायगड विरुद्ध कोल्हापूर वम हात्मा नगर क्रिकेट मैदानावर अँम्बीशिअस विरुद्ध जालना यांच्यात सामना होणार आहे.

LEAVE A REPLY

*