Type to search

जळगाव

सावखेडा सरपंच पद अपात्र : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

Share

वावडे ता.अमळनेर (वार्ताहर)- तालुक्यातील सावखेडा ग्रा.प. सरपंच कोकिळाबाई अहिरे (कोळी) यांचे सरपंचपद व सदस्यत्व औरंगाबाद खंडपीठाने रद्द करून त्यांना अपात्र करण्यात आले आहे.

कोकिळाबाई या सावखेडा ग्रापंतीच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या. सदर ग्रा प सरपंच पद (एस.टी) राखीव असल्याने कोकिळाबाई कोळी यांनी आपण (एस टी) प्रवर्गातील असल्याचे निवडणूक नामनिर्देशन पत्रात नमूद करून सरपंचपदी निवडून आल्या. निवडणुकीचा अर्ज भरतांना व नंतर कोकिळाबाई कोळी यांनी (एस टी) या प्रवर्गातील जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांचे ग्रा प सदस्यत्व रद्द करून त्यांना अपात्र घोषित करणेबाबत लेखी तक्रार ग्रा प सदस्य गुलाब उखा भिल यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात केली होती.

चौकशी व सुनावणी दरम्यान जळगाव जिल्हाधिकारी यांनी कोकिळाबाई कोळी यांचे ग्रा प सदस्यत्व रद्द केले होते. जळगाव जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला कोकिळाबाई कोळी यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून स्थगिति मिळविली परंतु तक्रारदार गुलाब उखा भिल यांनी औरंगाबाद खंडपीठात विधींज्ञ अॅड.अजय डी.पवार अॅड.योगेश एम.पाटील यांच्या मार्फत सदर याचिका तात्काळ सुनावणी घेणेकामी न्यायालयास विनंती करून याचिकेवरती अंतिम सुनावणी केली.

सुनावणी दरम्यान तक्रारदाराच्या वकिलांनी कायदेशीर व मुद्देनीहाय युक्तिवाद करून कोकिळाबाई यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर केले नसल्याने यांची याचिका रद्द करणेबाबत तसेच त्यांचे ग्रा प सदस्यत्व व सरपंच पद रद्द करण्यात यावे असा युक्तिवाद केला. सुनावणी दरम्यान खंडपीठाने कोकिळाबाई कोळी यांचे सदस्य व सरपंच पद रद्द करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल दिला. त्यावेळी तक्रारदार यांच्या वतीने विधींज्ञ अॅड.अजय डी.पवार व अॅड.योगेश एम.पाटील यांनी युक्तिवाद केला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!