Type to search

Breaking News जळगाव राजकीय

अमळनेर विधानसभा मतदार संघात २९ हजार ६०६ नव मतदार

Share

अमळनेर (प्रतिनिधी) –

अमळनेर विधानसभा मतदार संघात २९ हजार ६०६ नव मतदार वाढले आहेत. यामुळे हे
मतदारच विजयी उमेदवाराचे गणित ठरवणार आहे.

या मतदार संघात अमळनेर आणि पारोळा तालुक्यातील काही गावांचासमावेश आहे. यात अमळनेर तालुक्यातील १५२ आणि पारोळा तालुक्यातील ४७ अशा १९९ गावांचा समावेश आहे. गेल्यावेळी २ लाख ६२ हजार ४३१ मतदार होते. यात तब्बल २९ हजार ६०६ मतदारांची भर पडली आहे.

म्हणजेच आता २ लाख ९२ हजार ३७ मतदार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २९ हजार ६०६मतदारांची वाढ झाली आहे. हे वाढीव नव मतदार साधारणतः १८ ते २५ शीच्या वयोगटातील आहेत. त्यामुळे नव्या विचारसरणीचे हे मतदार आहेत. शैक्षणिक प्रगल्भता आणि सोशल मीडियाचा अधिक वापर करणारी ही नव पीढी आहे.

त्यामुळे ते स्वतंत्रपणे विचार करणारी आहेत. कोण उमेदवारआपल्या मतदार संघाचा विकास करू शकेल याचा अंदाज ते बांधत आहेत. त्यामुळे या मतदारांची मते ही विजयी उमेदवारासाठी निर्णायक अशीच ठरणार आहेत.

तिरंगी लढतीत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ हजाराच्या फरकाने आमदार चौधरी यांचा विजय झाला होता. तर यंदा भाजपाचे शिरीष चौधरी आणि राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्यातच दुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे वाढीव २९ हजार नव मतदार या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!