Type to search

जळगाव राजकीय

उदय वाघ : (जिवन परिचय) अमळनेर तालुक्याचा ढाण्या वाघ, हाडाचा पत्रकार हरपला

Share

राजेंद्र पोतदार

अमळनेर – 

अमळनेर तालूक्याचा ढाण्या वाघ सर्वसमान्य कार्यकर्त्यांना जिवाला जिव देणारा सच्चा नेता बापू अर्थात उदय वाघ यांचे आज दि.२८ रोजी सकाळी १० वा ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले, त्यांच्या निधनाचे बातमी वाऱ्यासारखी तालूक्यासह जिल्ह्यात पसरताच त्यांचा चाहत्या वर्गाला प्रचंड धक्का बसला एक उदयोन्मूख नेता हरपला.

ऊदय वाघ यांचा अल्पसा जिवन परिचय

तालुक्यातील डांगर गावातील सुपुत्र उदय भिकनराव वाघ यांची सरपंच पदापासून ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंतचे कार्य पाहता त्यांचा आलेख आजवर उंचावत आहे. सरपंच असतांना एकाच वेळी डांगर गावात ४२ घरकुलांचे बांधकामपूर्ण करून गावक-यांमध्ये उत्साह निर्माण केला होता.

याच दरम्यान पदवीपर्यंत शिक्षण यांनी प्रताप महाविद्यालयात पूर्ण केले. वेळोवेळी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती वाघ कुटुंबाला मिळाली आहे. यामुळे गावसरपंच ते एवढ्यामोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पर्यंतचा प्रवास उदय वाघांचा खडतर आणि बिकट प्रवास त्यांनी केला आहे.

यात वेळोवेळी त्यांच्या पत्नी विधान परिषदेच्या आमदार सौ.स्मिता  वाघ यांनी त्यांना भक्कम साथ दिली. यात सुरवातीच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये कार्यकर्ता या दशेपासून त्यांनी स्वता: भोवती जी शिस्त बांधून घेतली त्या आधारावर आज त्यांनी जिल्ह्यावर पकड भक्कम ठेऊन सर्वत्र भाजपामय स्थिती निर्माण केली आहे.

पक्षात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालणे संघटन मजबूत करणे आणि पक्ष वाढवणे असे निस्वार्थीपने काम करत असतांना पक्षाने त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना जिल्हा सरचिटणीसपदी विराजमान केले होते. याच आधारावर त्यांना जिल्हा बँकेवर, जिल्हा दूध फेडरेशन वर संचालक म्हणून निवडून आणले होते.

या सर्व कामांमध्ये यशस्वी ठरलेल्या उदय वाघांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा गोवा प्रभारी म्हणून पक्षाने निवड केली होती.

उदयबापू दुस-यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड केली. २०१७ मध्ये झालेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सत्ता एक हाती आणण्यात त्यांना यश मिळाले.

उदय वाघ याच्या कार्यकाळत जळगाव मनपात तत्कालीन मंत्री गिरिष महाजन व इतर नेत्यांच्या सहकार्याने इतिहास रचून सर्वाधिक भाजपाची जागा पटकावल्या व एक हाती सत्ता मिळवली.

राजकीय यशाची पताका वाघ दांपत्य तालुक्यात फडकवून यशाची शिखरे गाढत असतांनाच आमचे सन्मित्र व जिवा भावाचे जिवलग स्नेही सच्चा नेता हाडाचा पत्रकार असलेल्या ऊदय बापूंनी अशी एक्झीट घेतली हे सत्य अजूनही मनाला पटत नाही मात्र ते सत्य असून एका सच्चा दिलदार मित्र अभ्यासू राजकारणी निधड्या छातीचा खंबीर यूवा नेत्याला देवाने आपल्याकडे बोलावून घेतले त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हि प्रभू चरणी प्रार्थना.

– मो.नं. ८४१२०२११४४

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!