Type to search

Breaking News जळगाव

अमळनेर एस.टी.आगाराचे डिझेल संपले : ९१ बस फेऱ्या रद्द ; प्रवाशांचे हाल

Share

अमळनेर (प्रतिनिधी) –

एस.टी.महामंडळाच्या अमळनेर आगाराचे डिझेल संपल्यामूळे बाहेरगावी जाणाऱ्या ९१ फेऱ्या रद्द केल्यामूळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी

दुपारी २ वाजेपासून ६ वाजेपर्यंत बसची वाट पहात उभे आहेत. विद्यार्थ्यांचे पालक हैराण झाले आहेत.

वरूनच डिझेल नसल्यामूळे परिस्थीती सुधारू शकत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. युती शासनाचे महामंडळच बंद करण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला असल्याची प्रतिक्रीया काही कामगारांनी खाजगीत व्यक्त केली. असा प्रसंग प्रथमच आला असून या महिन्यातला हा तिसरा प्रसंग आहे.
यावेळी जिल्हा कंट्रोलर राजेंद्र आत्माराम देवरे यांनी भेट दिली मात्र कूठलाही मार्ग निघाला नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!