Type to search

जळगाव

अमळनेर येथे नदीत बुडून एकाचा मृत्यू तर एक बेपत्ता

Share

अमळनेर (प्रतिनिधी) –
बोरी नदीत गोपाळीकडे हिगोणे शिवारात ८ ते १० मूले पोहायला गेले असता सुमारे ३० फूट खोल पाण्यात २ मुले बूडाले तर बाकीचे मुले पाण्यात न उतरताच बाहेर पडले. यातील एकाचा मृतदेह सापडला असून ग्रामिण रूग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या मुलाचा अजूनही शोध सूरू आहे. दोन्ही मुले कसाली मोहल्ला भागातील आहेत. दानिश शे. अरमान (वय १६) याला बाहेर काढले तर शाहिदखा रहेमानखा (वय १६) रा. कसाली मोहल्ला अजूनही पाण्यात आहे. न.पा. व महसूल पोलीस प्रशासनातर्फे पोहणाऱ्या तरूणांकडून अजून शोध सूरू आहे. बोरी नदीत शहरातील ७ ते ८ मुले बुडाल्याची माहिती पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. बुडालेल्या तरूणाचा शोध सूरू होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!