Type to search

जळगाव शैक्षणिक

अमळनेर : 12 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत एन.टी.मुंदडा स्कूलला विजेतेपद

Share

स्वरूप संदीप नेरकर ठरला मालिकावीर
अमळनेर । प्रतिनिधी

जैन इरीगेशन सिस्टिम आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव यांच्यातर्फे जळगाव जिल्हा 12 वर्षाखालील आंतर शालेय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हीव स्कूल अमळनेर ला विजेतेपद मिळाले. तर काशिनाथ पल्लोड स्कूल जळगावला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेत एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हीव स्कूल क्रिकेट संघाचा कर्णधार स्वरूप संदीप नेरकर याने अंतिम सामन्यासह तीन सामन्यात सामनावीरचा पुरस्कार मिळवित मालिकावीरचा पुरस्कार देखील मिळाल्याने स्वरूप नेरकर याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर स्पर्धेतील सर्व सामन्यात स्वरूप संदीप नेरकर यानेच स्पर्धेतील एकमेव अर्धशतक झळकावले यासाठी ‘स्पेशल अचिव्हमेंट्स’चा पुरस्कार देखील मिळाला. 12 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट मध्ये अल्पावधीतच नावारूपाला आलेला स्वरूप हा अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातील प्रा.संदिप नेरकर यांचा सुपुत्र आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर स्पर्धेत मानस पाटीलला देखील ‘उत्कृष्ट झेल’ व ‘क्षेत्ररक्षण’ साठी स्पेशल अचिव्हमेंट्सचा पुरस्कार मिळाला.तर एका सामन्यासाठी ओम पाटील यास ‘सामानवीर’ पुरस्कार तसेच देवर्षी शिंपी यास उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळाला.

श्री एन.टी.मुंदडा ग्लोबल व्हिव क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमीझ, रौनक सर, प्रतीक सर, रोहन मुंदडा, संस्थेचे चेअरमन प्रकाश मुंदडा, योगेश मुंदडा, पंकज मुंदडा, प्रिन्सिपॉल लक्ष्मण सर व सर्व शिक्षकांनी स्वरूप नेरकर व यशस्वी संघाचे अभिनंदन केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!