Type to search

आवर्जून वाचाच जळगाव शैक्षणिक

मुंदडा ग्लोबल स्कुलच्या प्राचार्यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्काराने सन्मान

Share

अमळनेर (प्रतिनिधी) –

येथील मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी.मुदडा ग्लोबल व्हयु स्कुल या शाळेचे प्राचार्य श्री लक्ष्मण लजपथी यांचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आयकॉन पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

सपुर्ण भारतातून ७६ प्राचार्यांची निवड करण्यात आली होती त्यात महाराष्ट्रातून तीन प्राचार्यांची निवड करण्यात आली. त्यातून जळगाव जिल्हयातुन एकमेव ग्लोबलचे प्राचार्य लक्ष्मणसर यांची निवड करण्यात आली. नवी दिल्ली येथे हा आवार्ड देण्यात आला. सदर आवार्ड शाळेचे उत्कृष्ट व्यवस्थापन, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड कशा प्रकारे निर्माण होईल यासाठी प्रयत्नशील असणे, विद्यार्थ्यांना विविध स्पर्धात्मक परिक्षेत राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कशा पध्दतीने मजल मारता येईल याबददल योग्य ते मार्गदर्शन करणे. अशा सर्व बाबींचा विचार करून सदर आवार्ड देण्यात आला.

सदर कार्यक्रम आर्जेंटीना रिपब्लिकचे अँबेसिडर डॅनियल चुबरू यांचे हस्ते आवार्ड स्विकारणे म्हणजे हा एक प्रकारचा विशेष सन्मान होता. इंटरनॅशनल एज्युकेशन आईकॉन्स २०१९, टेक प्रोलब्ज स्कुल ऑफ रोबोटीक्स यांचे तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अर्जेंटीना गणराज्यचे राजदुत यांच्या व्यतिरीक्त या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आरोन नुमेब धानाउच्च आयोगाच्या सचिव हया होत्या.

आवार्ड मिळाल्याबद्दल प्राचार्य लक्ष्मणसर यांचे, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुदडा, चेअरपर्सन सौ.छाया भाभी मुंदडा, सचिव अमेय मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा, नरेंद्र मुंदडा, राकेश मुंदडा, पंकज मुंदडा, सौ.दिपीका अमेय मुंदडा व सर्व पदाधिकारी, प्रि-प्रायमरी प्राचार्या सौ.विद्या लक्ष्मण, प्रि-प्रायमरी को ऑडीनेटर सौ.योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!