Type to search

Featured maharashtra जळगाव फिचर्स मुख्य बातम्या

ऐतिहासिक निर्णय : एक किलोची कट्टी बंद !

Share
2 लाख 40 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी खात्यावर जमा, Latest News Farmers Account Loan Paid Ahmednagar

अमळनेर कृउबाचा चांगला निर्णय

अमळनेर – 

कृषि उत्पन्न बाजार समितीतीत शेतकर्‍याने विक्रीला आणलेल्या शेतमालाची भुईकाट्यावर मोजमाप केले असता कापली जाणारी क्विंटमागे 1 किलोची ‘कट्टी’ बंद करण्याचा ऐतिहासीक निर्णय कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, उपसभापती अ‍ॅड.श्रावण ब्रह्मे व सर्व संचालक मंडळाने आज घेतला आहे.

सदरचा प्रकार गेल्या 20 वर्षांपासून आजपर्यंत सुरू होता. हा निर्णय आ.स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. निर्णयात व्यापारीबांधवसह आडत असोसिएशन, हमाल मापाडीबांधव यांचे सहकार्य लाभल्याचे सभापती श्री.पाटील यांनी सांगीतले.

अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीत सन-2001 पासून ते आजपर्यंत शेतकर्‍यांच्या विक्रीला आलेला शेतमाल भुईकाट्यावर मोजमाप केला असता प्रती क्विंटलला 1 किलो कट्टी कापली जात होती. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक, नुकसान सहन करावे लागत होते.

या सर्वबाबींचा विचार करून आ.स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाने बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, उपसभापती अ‍ॅड.श्रावण ब्रम्हे व सर्व संचालकांनी कट्टी पद्धत बंद करण्याचा प्रस्ताव मांडला. यासाठी सर्व व्यापार्‍यांना प्रथम विश्वासात घेवून चर्चा केली. त्याला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच हा ऐतिहासीक निर्णय घेण्यात आला.

निर्णयाला व्यापारीबांधवाहसह आडत असोशिएसन व हमाल-मापाडीबांधव यांनीही अनमोल सहकार्य केले. या निर्णयामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान थांबणार असून शेतकरीहिताचा निर्णय बाजार समितीने घेतल्याने शेतकरीबंधु व तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

कडधान्य सोडून गहू, बाजरी, ज्वारी, दादर धान्याच्या मोजमापावर ही कट्टी सरसकट लावली जात होती. प्रत्येक शेतकर्‍याचा 50 ते 100 क्विंटलपर्यंत माल मोजला जात होता. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक झळ सोसावी लागत होती, त्यावर हा शेतकरीहिताचा निर्णय घेतला गेला आहे. याचे सर्वतरातून स्वागत होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!