Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedअमळनेर : मद्यविक्री करणाऱ्या १५ दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल

अमळनेर : मद्यविक्री करणाऱ्या १५ दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल

शहरातील २५ पैकी १५ मद्य विक्री करणाऱ्या दूकानदारां विरूध्द मद्य साठ्यात तफावत केल्यी प्रकरणी गून्हा दाखल करण्यात आला आहे  लॉकडाऊनच्या १ महिन्याच्या कालावधीत मद्य विक्रेते दूकाने बंद असतांनाही दूप्पट तिप्पट भावाने मोठ्या प्रमाणावर अमळनेरात विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री करण्यात आल्याचे आ. अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
त्यानंतर काल दिवसभर  राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अमळनेर शहरात तपासणी मोहीम हाती घेत  एकूण २५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ दुकानदाराविरुद्ध मद्य साठा तफावत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून जिल्हयातील ही मोठी साखळी असल्याचेही बोलले जात आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पाहिल्यांदा एव्हढ्या मोठया प्रमाणात कारवाई होत असल्याने प्रशासनाचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
शहरातील बिअर बार वॉईन शॉप  वर   कारवाई करण्यात आली त्यात नरेश लिकर्स, के. एस ललवाणी, सुनीता भरत ललवाणी, एच टिल्लूमल कंपनी. भरूच ब्रँडी हाऊस, हॉटेल न्यू योगेश, हॉटेल प्रतिभा, हॉटेल राजा गार्डन, हॉटेल साई प्रसाद, हॉटेल उदय, हॉटेल आराम, हॉटेल कुणाल, हॉटेल सम्राट, हॉटेल पायल,हॉटेल पूनम यांचा समावेश आहे
- Advertisment -

ताज्या बातम्या