Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला दगावली : नातेवाईकांचा आरोप

Share

अमळनेर (प्रतिनिधी) –

डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे गर्भवती महिला दगावली व २ तासापूर्वी त्या महिलेचा मृत्यू होवूनही पूढील ऊपचारासाठी धूळ्याला पाठविण्याचा डॉक्टरांनी बनाव केल्याचा आरोप करित रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना दि.१८ च्या मध्यरात्री २ वाजेच्या सूमारास धूळे रोड वरील बहूगूणे रूग्णालयात घडली.

शहरातील ह्रदय रोग तज्ञ डॉ.निखील बहुगुणे यांचे रूग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या सहा महिन्याच्या गरोदर महिला तालूक्यातील प्रगणे डांगरी येथील माहेरवासीन असलेली जयश्री प्रमोद कोळी (वय २२) तिच्या पांढऱ्या पेशी वाढल्याने ती धुळे रोडवरील डॉ.निखिल बहुगुणे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी २ दिवसापासून दाखल होती.  डॉ.बहुगुणे यांनी तिची प्राथमिक तपासणी करून तिला धुळे येथून विविध तपासण्या करण्यास सांगितले. त्या तपासण्यांचा अहवाल देखील नील आल्याचे जयश्रीच्या नातेवाईकांनी सांगितले.

मंगळवारी रात्री तिला सलाईन लावल्यानंतर तिची हालचाल बंद झाली होती. त्यामुळे घाबरून जाऊन तिच्या नातेवाईकांनी डॉ.बहुगुणे यांची भेट घेतली. त्यावेळी डॉ.बहुगुणे यांनी तिला धुळे येथे हलवण्याचा सल्ला दिला. अम्ब्युलन्समध्ये असिन्स्टंट डॉ.सोबत जयश्रीला घेऊन नातेवाईक धुळे येथे निघा

ले, मात्र रस्त्यातच आर.के.नगर जवळील अनुसया पेट्रोल पंपाजवळ नातेवाईकांनी  ती हालचाल करत नसल्याचे डॉ.बहुगुणे यांना फोन वरून सांगितले.

तेथून ते पुन्हा हॉस्पिटलला आले. त्यावेळी डॉ.बहुगुणे यांनी जयश्रीला तपासले असता ती मृत झाल्याचे सांगितले, मात्र जयश्रीचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला. जयश्रीचा मृत्यू झाल्याचे वृत्त डांगरी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. तिचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप करून प्रचंड संताप व्यक्त केला.

यावेळी डॉ.निखिल बहुगुणे घरात निघून गेल्याने काही नातेवाईकांनी त्यांना गाठून जाब विचारला. विवाहितेच्या नातलगांनी
त्यांना मारहाण  केली. यात त्यांच्या मानेवर पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर त्यांच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या वादात डॉक्टरांची पत्नी व कंपाऊडरला देखील किरकोळ मार लागला
.

चांगले डॉक्टर म्हणून आहे ओळख

डॉ.निखिल बहुगुणे हे एमडी असल्याने ते अमळनेर शहरासह तालुक्यात चांगले डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसामान्यांसह अधिकाऱ्यांपर्यंत, सामाजिक कार्यकर्त्यां सह राजकारण्यांपर्यंत त्यांचे वलय आहे. आडनावाप्रमाणेच ते ‘बहुगुणी’ असल्याने नेहमी त्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते.

पैशांपेक्षा गोतावळा आणि चांगल्या उपचारांनी दुवा मिळवण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. म्हणूनच ते सहह्रदयी आणि संवेदनशील डॉक्टर म्हणून अमळनेर शहरात सुपरिचित आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेबाबत सर्वच स्तरातील नागरिकांनी डॉ.
बहुगुणे यांची भेट घेऊन दिलासा देत माहिती घेतली. कोणत्याही डॉक्टराला आपला रुग्ण दगावू नये असेच वाटते, कारण याच्यामुळे त्यांची प्रक्टिस आणि समाजावरही परिणाम होतो. म्हणून ते रुग्णाला बरे करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत
असतात.

डॉक्टर हे भूतलावरील देवदूत म्हणून प्रयत्न करतात, पण शेवटचा निर्णय देवावरच असल्याने कालसारख्या विपरीत घटना या दुर्दैवानेच घडतात. असे मत डॉ.अनिल शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच संतापात डॉक्टरांबाबत कायदा हातात घेतल्याने त्याचे सर्वसामान्यांनाही परिणाम सहन करावे लागतात. म्हणून याप्रकरणी सामाजिक आणि राजकीय पुढाऱ्यांनी मध्यस्थि करीत अखेर या वादावर पडदा टाकला. मात्र दूपारी धूळ्याहून त्या महिलेचा मृतदेह गावी आणला असता दवाखान्या जवळ संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोखो केला पोलीसांनी हस्तक्षेप करित मृतदेह गावी रवाना केला.

दरम्यान रात्री २ ते ३ वाजेला हि घटना पो.नि. अंबादास मोरे यांना समजताच रूग्णालयात स्वतः भेट देत पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. डॉक्टर व डांगरी ग्रामस्थांचे सांत्वनासाठी आ. शिरिष चौधरी, आ.स्मिता वाघ, माजी आ.डॉ.बी.एस.पाटील, डॉ.अनिल शिंदें सह शहरातील सर्वच डॉक्टरांनी धाव घेतली तर डांगरी ग्रामस्थांचे वतीने सरपंच अनिल शिसोदे, महेंद्र बोरसे आदिंनी सामंजस्य घडवून आणले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!