Type to search

Breaking News जळगाव विधानसभा निवडणूक २०१९

अमळनेर मतदार संघात भूमिपूत्राला मिळाला न्याय : परिवर्तन

Share

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यातील मतदारांनी यंदा खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणले आहे. यंदाची ही विधानसभा निवडणुक अनेकांना वरवर एकतर्फी वाटत होती मात्र शेवट पर्यंत दोन्ही उमे

दवारांमध्ये चांगलीच चुरस रंगली होती.

त्यात सुरवातीपासून लीड घेतलेल्या अनिल भाईदास पाटील यांनी बाजी मारली.
गेल्या २ निवडणूकीत अपक्ष निवडून आलेल्या आमदार यावेळी राष्ट्रवादीने बाजी मारत शिरीष चौधरी यांना पराभूत केले भाजपचे तिकीट घेणे नूकसानीचे ठरणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरू होती.

त्याची कारणे अनेक असली तरी दुरंगी लढत हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्यातच गेल्या पाच वर्षात युती सरकारकडून तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना ठेंगाच दाखवण्यात आला होता. माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या कार्यकाळातील काही कामे अजूनही अपूर्ण होती. त्यामुळे जनतेत नाराजी होती. तसेच राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्या विषयी अमळनेरकर जनतेत सहानुभूती निर्माण झाली होती.

त्या सहनभुतीचा फायदा उचलण्यात ते यशस्वी ठरले. त्यांच्या पाठीशी असणारे अनेकांचे अदृश्य हाथ ही त्यांच्या विजयासाठी मदतगार ठरले आहेत. त्यामुळे ही लढत अनिल पाटील यांनी जिंकली. त्यामुळे अनेक गावात जल्लोष सुरू झाला आहे. हि निवडणूक पक्ष विरहित भूमिपूत्र विरूध्द नंदपूत्र अशिच ठरली आणि अखेर भूमिपूत्राला न्याय मिळाला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!