Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

मामाच्या लग्नासाठी आलेल्या भाचीवर सामुहिक अत्याचार; मारहाणीत एका संशयिताचा मृत्यू

Share

अलवर : राजस्थानमधील अलवर येथे मामाच्या लग्नासाठी आलेल्या अल्पवयीन भाचीवर रात्रीच्या वेळी सामुहिक अत्याचार झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान, एका संशयिताला गावकऱ्यांनी मारहाण केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. राहुल गुर्जर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस अधिकारी जितेंद्र सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आणि दिलेल्या फिर्यादीनुसार अल्पवयीन मुलगी मामाच्या लग्नासाठी देवसनगाव येथे आली होती. १४ मेच्या रात्री काही नराधमांनी तिला तोंड बांधून नेले आणि तिच्यावर सामुहिक अत्याचार केला.

दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सांगितले की, लग्न आटोपून गावाकडे तिघेजण परत निघाले होते. यातच गावकऱ्यांनी रस्त्यात त्यांना अडवले. त्यानंतर झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!