Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

संजू सॅमसनचा झंझावात; विराट, रोहितपेक्षा ठोकले जलद ‘द्विशतक’

Share

अलुर | वृत्तसंस्था

युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने विजय हजारे चषकात द्विशतक ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भारतात होणाऱ्य़ा विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळ संघाकडून फलंदाजी करणाऱ्या संजूनं यंदाच्या स्पर्धेतील पहिले द्विशतक त्याने लगावले.

विशेष म्हणजे, संजूने आजचे ठोकलेले द्विशतक भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात विराट आणि रोहितने लगावलेल्य़ा द्विशतकापेक्षा जलद ही कामगिरी केली असल्याने सध्या सोशल मीडियात संजूच्या खेळीचे कौतुक केले जात आहे.

केरळसाठी खेळणाऱ्या 24 वर्षीय विकेटकीपर संजूने गोवा विरोधात झालेल्या सामन्यात केवळ 125 चेंडूत चौकार आणि षटाकारांची आतषबाजी करत वादळी द्विशतक केले. याआधी कोणत्याच भारतीय खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एवढ्या जलद दुहेरी शतक लगावलेले नाही. भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधले हे आठवे दुहेरी शतक आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!