Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या

जम्मू काश्मीर अनंतनागमध्ये चकमक; हिजबुलच्या कमांडरसह तीन आतंकवादी ठार

Share

श्रीनगर | प्रतिनिधी 

जम्मू-कश्मीरमधील अनंतनागमध्ये आज पहाटे झालेल्या गोळीबारात हिजबुल मुजाहिदीनच्या कमांडरसह तीन आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. सुरक्षारक्षकांची मोठी कामगिरी समोर येत आहे. या कारवाईत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर नासिर चदरू याला ठार करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. मंगळवारी रात्री उशिरा ही चकमक सुरू झाली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले होते. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूने गोळीबार सुरू होता.
सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ऑपरेश यशस्वी झाले.  सुमारे तीन तास चालेल्या चकमकीत तीन आतंकवादी मारण्यात आले तर यात हिजबुलचा कमांडर नासिरचादेखील यात समावेश आहे.

याआधी अनंतनागच्या कोकरनाग मध्ये 5 ऑक्टोबरला झालेल्या आतंकवाद्यांनी नागरिकांवर फायरिंग करत त्यात अनेकांना जखमीदेखील केले होते.

तसेच 12 ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याने यात पाच नागरिक गंभीर जखमी झाले होते. तर १४ ऑक्टोबरला आतंकवाद्यांनी ट्रकचालकाची हत्या केली होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!