Type to search

Featured जळगाव फिचर्स

जिल्ह्यातील सर्व उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार-जिल्हाधिकारी

Share

जळगाव  – 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणार्‍या कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय वगळून इतर उद्योग १५ एप्रिलपर्यंत बंद राहणार  आहेत, अशी माहिती डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी  जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपनी व तत्सम आस्थापना ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करण्याबाबत आदेश पारित करण्यात आलेले होते.

शासनाने १४ एप्रिल, २०२० पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (लॉक डाऊन) लागू करण्यात आल्याने यामधून अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणार्‍या कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय वगळून इतर सर्व कंपन्या, उद्योग, कारखाने, व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याबाबतचे आदेश १५ एप्रिलच्या रात्री १ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!