Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार: उध्दव ठाकरे

Share

मुंबई | वृत्तसंस्था

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेल्या वचनाप्रमाणे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यात सांगितले. शिवसेनेचे सर्व 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवार या मेळाव्यासाठी हजर होते. मात्र 288 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांना बोलावले म्हणजे युती तुटली, असे होत नाही असा खुलासा देखील उद्धव ठाकरे यानी केला आहे.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी स्वतः शिवसेनाप्रमुखांना हातात हात घेऊन वचन दिले आहे की एक न एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पूर्ण करेन. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता पाहिजे आहे, त्यामुळे सगळ्या 288 जागांवरच्या इच्छुकांना बोलावले असल्याचे सांगून ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात आपण जे काही काम केले आहे, त्याबद्दल धन्यवाद द्यायला बोलावले आहे.

कालच्या अजित पवार यांच्या बाबतच्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर ते म्हणाले की, मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही, मी शिवसैनिक म्हणून काम करत राहणार आहे. युती आज-उद्या जाहीर होणार आहे. आमची अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरु आहे. दोस्ती केली तर मनापासून करणार, असेही उद्धव ठाकरेंनी म्हणाले.

शिवसेनेच्या या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पवारांच्या कौटुंबिक कलहात रस नसल्याचे सांगून सूड उगवणाऱ्यांवर महाराष्ट्र आसूड ओढतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. हा महाराष्ट्र आहे, सुडाचे राजकारण कधीच सहन करणार नाही. आम्ही कोणाशी सुडाने वागणार नाही. शिवसेनेशी वाईट वागले, त्यांचे मी वाईट कधीच चिंतित नाही, असेही उद्धव ठाकरें म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!