आलिया बनली मोस्ट एंगेजिंग एक्टरेस ऑफ बॉलिवूड

0
मुंबई- आलियाने सोशल नेटिवर्किंग साइट्सवर लोकांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे ट्विटरवर ती सध्या मोस्ट एंगेजिंग एक्टरेस ऑफ बॉलिवूड बनली आहे. आलिया भट 100 गुणांसह मोस्ट एंगेजिंग एक्टरेस ऑन ट्विटर ठरली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. नुकतीच, प्रियांका चोप्रा फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी झाल्याने चर्चेचा विषय ठरली होती. स्कोर ट्रेंड्सने दिलेल्या माहितीनुसार, आलिया पहिल्या स्थानी आहे तर 89 गुणांसह अनुष्का शर्मा ट्विटरवर दुसर्‍या स्थानी आहे. दीपिका पादुकोण 76 गुणांसह तिसर्‍या स्थानी आहे. श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडीस चौथ्या स्थानी तर आंतरराष्ट्रीय आयकन प्रियांका चोप्रा 63 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीर कपूरच्या लिंक-अप्सच्या बातम्या सर्वत्र आहेत. पब्लिक इवेंटमध्येही ते दोघे ब-याचदा एकत्र दिसतात. ह्या सगळ्यामूळे ट्विटरवर आलियाविषयी जास्त पोस्ट आहेत. आलियाविषयीच्या पोस्टवर सगळ्यात जास्त लाइक, ट्विट-रिट्विट दिसून येतात. त्यामूळे आलिया ट्विटरवर मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी झाली आहे.

LEAVE A REPLY

*