दारू बंदीच्या मागणीसाठी नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0
अहमदनगर – गावात दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे, अनेकांचे संसार या दारूमुळे उध्वस्त होत आहेत. दारूड्यांच्या भांडणांमुळे गावाची शांतता धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने गावात दारूबंदी करावी या मागणीसाठी नागरिकांनी बुधवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,जामखेड तालुक्यातील झिक्री या गावामध्ये दारूड्यांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गावात ब-याच जणांचे संसार उध्वस्त झाली आहेत. बरेच लोक अपघातात मरण पावले आहेत.

ब-याच महिलांना दररोज मारहाणीस सामोरे जावे लागते व गावाचा विकास न होता गाव व गावातील तरूण अधोगतीच्या मार्गाला लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गावात दारूबंदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या निवेदनासोबत ग्रामपंचायतचाही ठराव जोडण्यात आला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवसेनेचे जामखेड तालुका प्रमुख ऋषिकेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सविता साळुंके, मंदा साळुंके, रुख्मिणी साळुंके, अश्विनी साळुंके, मालन भाकरे, शितल ढापरे, विमल खैरे, जिविदा शेख, हिराबाई खैरे, रुक्साना पठाण, साखरबाई साठे, साळू वाघमारे, संजीवनी लोहार, लतीपा पठाण,समीर पठाण, राम साळुंके, संतोष साळुंके, मिनाज शेख, दादासाहेब ठाकर, विजय चौधरी आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

*