Friday, April 26, 2024
Homeनाशिककरोनाच्या सावटामुळे सराफ, वाहन, बांधकाम व्यावसायिकांचा अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त टळला

करोनाच्या सावटामुळे सराफ, वाहन, बांधकाम व्यावसायिकांचा अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त टळला

नाशिक । प्रतिनिधी

हिंदु धर्मातील सर्वात महत्वाचा सण, साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असलेला अक्षय तृतीया सण कोरोनाच्या सावटाखाली आज घरोघरी साजरा झाला. देव व पितरांना दान आणि गंगा स्नानावर निर्बंध आले. या सणांच्या निमित्ताने दागिने, वाहन, गृहोपयोगी वस्तु, घर – जागा खरेदी यातून दरवर्षी होणारी कोट्यावधी रुपयांची उलाढाल यंदा होऊ शकली नाही. यामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला. परिणामी यंदाची अक्षय तृतीया सर्वांच्या स्मरणात राहणारी ठरणार आहे.

- Advertisement -

करोना विषाणुच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने सर्वच धर्मीयांच्या सण उत्सवावर गदा आली आहे. सोशल डिस्टन्सिंंग पालनामुळे अनेक सण – उत्सव घरात साजरे करावे लागले असतांनाच आज हिंदुंचा सर्वात महत्वाचा सण अक्षय तृतीय करोनाच्या सावटाखाली साजरा झाला.

वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने देव – पितरांना उद्देशाने ऋण फेडण्यासाठी ब्राह्मणांना दान केले जाते, हवन केले जाते, या तिथीत जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते, असे मानले जाते. तसेच या तारखेला नवीन वस्त्र, दागिने, शस्त्र, घर जागा, वाहन खरेदी केल्यास त्या कायम टिकतात, सोने खरेदी केल्यास कायम संपत्ती येतेे.

अशाप्रकारे पार्श्वभूमी असलेल्या सण अगदी साध्या पध्दतीने नागरिकांना साजरा करावा लागला. यात दान, मंदिरातील पुजा हवन व स्नानावर निर्बंध आले. तसेच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा दुकाने वगळता सर्वच दुकाने व व्यावसाय बंद असल्यान इतर व्यवसायावर गदा आली.

यानिमित्ताने बाजारपेठेत खरेदीच्या निमित्ताने होणारी उलाढाल होऊ शकली नाही. आजही बाजारात पुजा साहित्य, आंबे व किराणा खरेदीसाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात काही ठिकाणी गर्दी दिसुन आली. आज पहाटे पाऊणे सहा ते दुपार 1.22 वाजेपर्यत असलेल्या मुहुर्तावर महिलांनी घरात पुजन व हवन करीत अक्षय तृतीया साजरी केली.

16 वर्षांनंतर गृह खरेदीला चागले दिवस

करोनाच्या पार्श्वभूमीवर रियल इस्टेटसह सर्वच उद्योग – व्यावसायाला मोठा अर्थिक फटका बसला आहे. पाडव्या नंतर अक्षय तृतीयांचा मुहुर्त हूकला असला तरी नागरिकांनी ऑन लाईनद्वारे घरांची माहिती घेऊन बुकींग केल्या आहे. आता नागरिक लॉकडाऊन उठण्याची वाट पाहत आहे. करोनाचा आता गृह खरेदीसाठी नागरिकांना फायदा होणार आहे. एसबीआयने गृह कर्जासाठी रेट ऑफ इंटरेस हा 7.15 टक्के असा केल्यामुळे नागरिकांनी घराच्या भाड्याइतक्या रक्कमेत स्वत:च्या घराचा हप्ता भरता येणार आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना घर घेता येणार आहे. या करोनाशी लढतांना नागरिकांना घराने वाचविले असल्याने आता पुढच्या काळात गृह खरेदीला चांगले दिवस येणार आहे.

– नरेश कारडा, सचालक कारडा कन्स्ट्रक्शन नाशिक

ग्राहकांनी ऑन लाईनद्वारे मुहुर्त साधला…

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने सराफी व्यावसायांसह सर्वच व्यावसायावर याचा परिणाम झाला असला तरी सोन्याचे भाव वाढत आहे. आजचा अक्षय तृतीयाचा मुहुर्त सर्वात मोठा मानला जात असल्याने आम्ही ग्राहकांना सोने खरेदीला पर्याय म्हणुन दिला आहे. यास ग्राहकांकडुन साधारण प्रतिसाद दिला आहे. साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहुर्त म्हणुन अक्षय तृतीयाकडे पाहिले जात असुन हा मुहुर्त साधत ऑन लाईन सोन्याची दागिने व चोख सोने खरेदी ग्राहकांनी केली आहे. आता लॉकडाऊन उठल्यानंतर याची डिलीवरी दिली जाणार आहे.

– मयुर शहाणे, संचालक मयुर अलंकार, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या