Video : रास्ता किसी के बाप का नही है! ‘अक्षय’ने शेअर केलेला व्हिडीओ तासाभरात दोन लाख नेटकऱ्यांनी बघितला

0
मुंबई | कुठल्या ना कुठल्या सामाजिक संदेशातून किंवा आगळ्यावेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेरित करणाऱ्या अक्षय कुमारने त्याच्या फेसबुक पेजवर वाहतूक नियम पाळण्यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

एक मुलगा त्याच्या दोन मैत्रिणींना दुचाकीवर बसवून विनाहेल्मेट सुसाट रस्त्यावरून सैरावैरा दुचाकी पळवत होता. अचानक अक्षय कुमार वाहतूक पोलिसाच्या वेशात याठिकाणी येतो आणि त्याला वाहतुकीचे नियम समजावून सांगताना म्हणतोय, रास्ता किसी के बाप का नही है!

वाहतुकीचे नियम पाळा, स्वतःही सुरक्षित राहा आणि इतरांनादेखील सुरक्षित ठेवा. सध्या हा व्हिडीओ फेसबुकवर कमालीचा हिट झाला असून अवघ्या तासाभरात या व्हिडीओला दोन लाखापेक्षा अधिक नेटकर्यांनी बघितला आहे.

LEAVE A REPLY

*