‘2.0’ या चित्रपटाच्या VFXवर 544 कोटी खर्च

0
मुंबई : रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. VFX चे बरंचसे काम बाकी असल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले गेले होते. या स्पेशल इफेक्टसाठीच तब्बल 544 कोटींचा खर्च आला आहे. केवळ VFX साठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करणारा ‘2.0’ हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

या चित्रपटाची पहिली झलक ऑगस्टमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती मात्र आता १३ सप्टेंबरला या चित्रपटाचा पहिला आणि बहुप्रतिक्षीत टीझर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय कुमार पहिल्यांदाच तामिळ चित्रपटात तेही खलनायकाची भूमिका साकारणार आहे.जानेवारी २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र याच महिन्यात ‘पद्मावत’ही प्रदर्शित होणार होता म्हणूनच चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होईल असं जाहीर करण्यात आलं. मात्र एप्रिलमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २९ नोव्हेंबर २०१८ ही तारीख निश्चित करण्यात आली.

LEAVE A REPLY

*