अकोले तालुक्यात आदिवासी दिन साजरा

0

अकोले (प्रतिनिधी) – आदिवासी संस्कृती अतिप्राचीन आहे. म्हणूनच आदिवासी समाज्याला देशातील मूलनिवासी म्हणून संबोधले जाते. आदिवासी जंगलात राहून नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करत असतात या आदिवासी समाज्याचा गौरव दिन म्हणजेच 9 ऑगस्ट….9 आ्ॅगस्ट हा आदिवासी समाजाचा राष्ट्रीय सणच …अकोले तालुक्यातील भुमिपुत्रांनी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जन्मभूमी व कर्मभूमीत हा आदिवासी दिन मोठ्या दिमाखदार व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

आदिवासी समाज्यातील संघटना व नेते यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवत न भुतो ना भविष्यती असा आदिवासी दिन साजरा केला.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या आदिवासी समाजाची मिरवणूक बाजारतळापासून सुरू झाली. यावेळी एक तीर एक कमान, सारे आदिवासी समान या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीत आदिवासी कांबड नृत्य, आदिवासी रेकार्ड नृत्यांने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अकोले आदिवासी तालुका असून भौगोलीक दृष्ट्या मोठा आहे. डोंगरदर्‍यांत विभागलेला आदिवासी समाज 9 ऑगस्टला क्रांतीदिन साजरा करण्यासाठी एकत्र येतो.
घाटघर, पांजरे, उडदावणे, कोतूळ, सातेवाडी, केळी रुम्हणवाडी, पळसुंदे, आंबीत, पाचनई, पाचपट्टा, भंडारदरा, बारी, कळस, राजुर, पिंपळगाव नाकविंदा, तांभोळ, समशेरपूर, सावरगाव पाट, तसेच मुळा, प्रवरा, आढळा व राजूर परिसरातून अनेक आदिवासी बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

युवा कार्यकर्ते राहुल गावंडे यांनी सर्व समाज बांधवांना भोजनाची व्यवस्था केली. सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारूती मेंगाळ, सतीश भांगरे, दीपक पथवे, देवराम सामेरे, डॉ.विजय पोपेरे, डॉ. उघडे, अक्षय भांगरे, रमेश धोंगडे, काशिनाथ साबळे, मारती लांघी, गटशिक्षण अधिकारी, हरिभाऊ अस्वले, पांडुरंग थिगळे, भरत मेंगाळ, अनिल तळपे, चंद्रभान मेंगाळ, संतोष परते, भागवत लेंडे, इंदुराज सुपे, काळू मेंगाळ , सुकटे ए.एल., सारिका कडाळी, सीताबाई गोंदके, मुरलीधर भांगरे, ज्ञानेश्वर झडे, मारूती शेंगाळ, काळू भांगरे, युवराज तळपे, रामदास गावंडे, राहुल गावंडे, दत्ता देशमुख,जयराम नवले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*