Thursday, April 25, 2024
Homeनगरअकोले : 45 ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी 258 तर सदस्य पदासाठी 745 अर्ज...

अकोले : 45 ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी 258 तर सदस्य पदासाठी 745 अर्ज दाखल

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणार्‍या व बहुतेक आदिवासी भागातील ग्रामपंचायत चा समावेश असणार्‍या 45 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवशी सरपंचपदासाठी 258 तर सदस्य पदासाठी 745 अर्ज दाखल झाले आहेत.

- Advertisement -

उद्या शुक्रवारी दि.2 सप्टेंबर रोजी दाखल अर्जाच्या छाननी मध्ये किती उमेदवाराचे अर्ज टिकुन राहतात याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील सुमारे 45 ग्रामपंचायतीच्या संरपच, सदस्यांची निवडणूकीची लगबग सुरु आहे. दि. 2 सप्टेंबर उमेदवारी अर्ज छाननी व 6 सप्टेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दि. 2 सप्टेंबर गुरुवार पर्यंत सरपंच पदासाठी 258 तर सदस्यपदासाठी 745 अर्ज दाखल झाले आहेत.

दरम्यान नुकतेच आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बिनविरोध निवडणूक करणार्‍या मतदार संघातील ग्रामपंचायतीस 26 लाख रूपये निधी दिला जाईल अशी घोषणा केली असली तर आ. लहामटे यांच्या घोषणेला किती गावे प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदिवासी विभागाचे केंद्र बिंदू असलेल्या राजूर गावची लोकसंख्या 10 हजार 46 असुन 17 ग्रा. पं. सदस्य आहेत. पण होऊ घातलेली राजुर ग्रामपंचायत निवडणुकीत 6 वार्ड करता 17 सदस्य आहे. तसेच जनतेतून थेट ही सरपंच निवड होणार आहे. राजूर मधुन ग्रामपंचायत सदस्य 49 तर सरपंच पदासाठी 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

तसेच आंबितखिंड, बाभूळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामणवन, गोंदुशी, – जामगाव, करंडी, कातळापूर, केळी-कोतूळ, केळी -ओतूर, केळी- रुम्हणवाडी, केळुगण, खिरविरे, खुंटेवाडी, कोहंडी, कोदनी, लव्हाळी ओतूर, माळेगाव, मान्हेरे, मवेशी, म्हाळुगी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पळसुंदे, पांजरे, पिंपरकणे, राजूर, रणद खुर्द व बुद्रुक, समशेरपूर, सांगवी, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेलद, शेणीत, शिरपुंजे बुद्रुक, टाहाकरी, तळे, तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे व वारंघुशी या 45 गावांतील 258 सरपंच व ग्रामपंचायत सदस्यासाठी 745 अर्ज तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करतांना अनेक जणांची धावपळ सुरू असल्याचे चित्र तहसील कार्यालय व परिसरात पाहायला मिळाले. तहसील कार्यालय व परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या