Type to search

Featured सार्वमत

अकोलेत मुसळधार पावसाला सुरूवात

Share

अकोले (प्रतिनिधी)-  भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी अधिक असले तरी अकोले शहर व परिसरात सायं.7 वाजेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. भंडारदरा येथे सायंकाळी अर्धातास जोरदार पाऊस झाला तर मूळा विभागातही दिवसभर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. अकोले तालुक्यातील आढळा, मूळा, प्रवरा परिसरात शुक्रवारी चांगला पाऊस पडला मात्र काल शनिवारी पावसाने उघडीप दिली. आज रविवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. दुपारी कडाक्याचे ऊन पडले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!