Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोले, राहुरी, श्रीगोंद्यात पाऊस

Share

भंडारदरा, मुळा पाणलोटात मध्यम हजेरी

अकोले, राहुरी, श्रीगोंदा (प्रतिनिधी)- गत दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. काल अकोले तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने उभी पिके तरारली आहेत. राहुरी ते कृषी विद्यापीठ दरम्यान जोरदार पाऊस झाला. तसेच श्रीगोंद्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

अकोले तालुक्यात ढगांच्या गडगडाटात, विजांच्या लखलखाटात पावसाने जोरदार हजेरी लावली. आढळा पट्ट्यातही पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. कोतूळ, समशेरपूर व अन्य भागातही पाऊस झाला. भंडारदरा वार्ताहराने कळविल्यानुसार भंडारदरा व पाणलोटात रात्री पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा धरणातही रात्री उशीरा आवक वाढली होती. पण धरण 100 टक्के भरलेले असल्याने ते पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले. मुळा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने मुळा नदीतील पाणी काही प्रमाणात वाढले आहे.

राहुरी ते कृषी विद्यापीठ दरम्यान दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. तसेच तालुक्याच्या काही भागात कमी अधिक पाऊस झाला. श्रीगोंदा तालुक्यातही सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने उभ्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!