Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोलेत कांदा 7000 वर

Share

अकोले (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या लिलावात शेतकर्‍यांच्या एक नंबर कांद्याला 7000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. बाजार समितीमध्ये काल 161 कांदा गोण्यांची आवक झाली.
राजेंद्र मारुती काळे यांनी 2 गोण्या विक्रीसाठी आणल्या होत्या त्यांना 7000 रुपये बाजारभाव मिळाला. काशिनाथ जिजाबा गायकवाड यांच्या 19 कांदा गोणी आणल्या होत्या. त्यांना 6500 रुपये, मधुकर काशिनाथ सावंत 14 गोणी 6711 रुपये कांद्यास बाजारभाव मिळालेले आहेत.

एक नंबर कांद्याला सरासरी 6001 रुपये ते 7000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाले. दोेन नंबर कांद्याला 5001 ते 6000 रुपये, तीन नंबर कांद्याला 3001 ते 4000 रुपये, गोलटी कांद्याला 3000 ते 4500 रुपये या प्रमाणे बाजारभाव मिळाले आहेत.

अकोले बाजार समितीच्या आवारात रविवार, गुरुवार या दोन दिवशी लिलाव होत आहेत. शेतकरी वर्गाने आपला कांदा योग्य बाजारभाव मिळणेसाठी बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा. कांदा 50 किलो बारदान गोणीत, वाळवून, निवड करुन बाजार समितीच्या आवारात आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!