Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

निळवंडे कालव्यांचे अकोलेतील काम सलग सुरु ठेवण्याचा आदेश

Share

उच्च न्यायालयाचा जनहित याचिकेवर सुनावणी

तळेगाव दिघे (वार्ताहर) – उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे कालव्यांचे अकोले तालुक्यातील शून्य ते 28 कि. मी. अंतरातील कालव्यांचे काम कुठलीही आडकाठी न आणता सलगपणे सुरु ठेवा, असा आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. आर. जी. अवचट यांनी दिला.

उत्तर नगर जिल्ह्यातील सात तालुक्यातील दुष्काळी 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे प्रकल्पाचे कामास निधी मिळण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते विक्रांत रुपेंद्र काले व नानासाहेब जवरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विधिज्ञ अजित काळे यांच्या जनहित याचिका दाखल केलेली आहे. निळवंडे कालवा कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेवर अकोलेतील कालव्यांचे बंद काम चालू करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश दिला होता.

मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली गेली नव्हती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी बैठक घेत बंदिस्त कालव्यांची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर अकरा जून रोजी अकोलेतील धरणाजवळ निंब्रळ येथे काम सुरु करण्यात आले. औरंगाबाद खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने मागील तारखेच्या आदेशाची अंमलबजावणी केली की नाही याची खातरजमा केली. त्यावेळी कालव्यांचे काम कुठलीही आडकाठी न आणता सलगपणे सुरु ठेवा, असा आदेश दिला.

कालवा कृती समितीच्या वतीने वकील अजित काळे यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद करताना सदर शून्य ते 28 कि. मी. अंतरातील कालव्यांचे काम सलगपणे चालु ठेवावे. काम कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली. त्यावेळी सरकारी अभियोक्ता अमरजितसिंग गिरासे यांनी अकोलेतील निळवंडे धरणापासून सुरु केलेल्या कामाचे कि. मी. निहाय नकाशे व कार्यकारी अभियंत्यांच्या सह्यानिशी कागदपत्राचे पुरावे सादर करून काम चालू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी वकील प्रज्ञा तळेकर यांनी अकोलेतील कालवे बंदिस्त करावे, अशी मागणी अकोलेतील शेतकर्‍यांच्यावतीने केली, मात्र न्यायालयाने ती मागणी मान्य न करता स्वतःचेच आदेश रद्द करण्यास असमर्थता दर्शवली आहे.

सुनावणीच्यावेळी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, अध्यक्ष रुपेंद्र काले, कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, संघटक नानासाहेब गाढवे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे, नामदेव दिघे, विठ्ठल पोकळे सहित कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!