भारनियमनाविरुद्ध अकोलेत शिवसेनेचा मोर्चा

0
अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील भारनियमनाविरुध्द शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला.
अकोले येथे वीजवितरण कंपनीच्या कार्यालयावर काल सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला व उपस्थित अधिकार्‍यांना घेराव घालण्यात आला . वीजवितरण कंपनी कडून दहा ते पंधरा तास भारनियमन सुरू असून शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकार कडून चालू असल्याचा आरोप तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केला आहे.
विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकरी वर्गाला शेतीला वेळेवर पाणी देता येत नाही, त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. आठ ते दहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भारनियन सुरू आहे, विद्यार्थी वर्गाच्या सध्या परीक्षा सुरू आहेत, त्यातच ग्रामीण भागात प्रवरा नदी काठच्या गावांत बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत असे धुमाळ यांनी निदर्शनास आणून दिले.
अकोले तालुक्यात सुरू असणारे भारनियमन तातडीने बंद करावे अशी मागणी अकोले तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून आठवडा भरात महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी श्री. धुमाळ यांनी दिला आहे.
अगस्ती कारखान्याचे संचालक महेश नवले, शिवसेनेचे शहर प्रमुख नितिन नाईकवाडी आदींनी महावितरणच्या अधिकारी यांना धारेवर धरले. या आंदोलनात नगरसेवक प्रमोद मंडलिक ,उपतालुका प्रमुख रामहरी तिकांडे, ज्येष्ठ नेते डॉ.मनोज मोरे, प्रदीप हासे, सुरेश भिसे, नंदकुमार वाकचौरे, भाऊसाहेब गोरेडे, विनायक वाकचौरे, बाळासाहेब वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे,
महेश देशमुख,संतोष वाकचौरे, किशोर गोडसे, अर्जुन गावडे, महेश देशमुख, बाळा दराडे, भाऊसाहेब सहाणे, राम सहाणे, नरेंद्र भोर , रजनीकांत भागरे, भाऊसाहेब भागरे, बाळासाहेब देशमुख, दतू शेणकर, सीताराम शेटे, सुनील बंगाळ, ऊमेश डावरे, हनुमान डावरे, समिर गोडसे, अभिजित धुमाळ आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे तास भर हे आंदोलन सुरू होते.

LEAVE A REPLY

*