अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस

0

भंडारदर्‍यातही जोरदार पावसाची हजेरी

अकोले/भंडारदरा (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसास सुरुवात झाली. काल शनिवारी दुसर्‍या दिवशीही जोरदार पावसाने तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या कमी अधिक प्रमाणात सरी कोसळत होत्या. भंडारदरा येथे शुक्रवारी बारा तासांत 15 मिमी पावसाची नोंद झाली.
तर शनिवारी रात्री उशारापर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. तालुक्यात अनेक ठिकाणी अगोदरच दुरवस्था झालेल्या रस्त्यांची आणखीनच दुरावस्था झाली आहे. त्यामुळे अगोदरच विजेच्या भारनियमनाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांचे या नुकसानग्रस्त पावसामुळे कंबरडे मोडले आहे.
अकोले शहर व परिसरात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. मध्यरात्री च्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतात व रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. काल शनिवारी सकाळ पासून पावसाचे वातावरण होते.
दुपारनंतर विजांचा कड डाटा सह पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांच्या डाळींब, भाजीपाला पिकांबरोबर नवीन लागवड केलेले कांदा रोपांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. प्रवरा परिसरातील इंदोरी-मेहेंदुरी पुलाच्या पुढे मेहेंदुरी व अन्य गावांकडे जाणार्‍या रस्त्यावर पुलाच्या नजीकच पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती वाहून आल्याने चिखल तयार झाला होता.यातूनच मार्ग काढतांना अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली.
तालुक्यातील प्रवरा, आढळा, मुळा व आदिवासी पट्ट्यातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अगोदरच नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणार्‍या शेतकर्‍यांना पुन्हा एकदा नव्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

 

LEAVE A REPLY

*