Type to search

Featured सार्वमत

अकोलेतील गांजवणे घाटात दरड कोसळली; विद्यार्थ्यांचे हाल

Share

अकोले (प्रतिनिधी)- अकोले तालुक्यातील राजूर पासून जवळच असलेल्या गांजवणे घाटात सकाळी दरड कोसळल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद झाली होतीे. त्यामुळे गांजवने घाटातून विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज व प्रवाशांना राजूरला पायी चालत जावे लागले. खेडे गावात येणार्‍या मुक्कामी असणार्‍या बस पाचनई, कुमशेत, मेचकरवाडी, अंबित, बलठन, या सर्व बस सकाळी घाटात अडकल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते.

बुधवारी अकोले-राजूर रस्त्यावरील चितळवेढे घाटात अशाच प्रकारे दरड कोसळून मोठा राडा रस्त्यावर आला होता. अकोले तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी दरडी कोसळून दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे कोणतीही हानी होऊ नये म्हणून दरडीला लोखंडी जाळीने बांधणे गरजेचे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!