अकोले : 11 धरणे भरली

0

कोतूळ (वार्ताहर)– तालुक्यातील मुळा पाणलोट क्षेत्रातील 146 दलघफू क्षमतेचे घोटी शिलवंडी हे धरण काल सकाळी 11 वाजता ओव्हरफ्लो झाले. मुळा पाणलोट क्षेत्रातील आंबीत (193 दलघफू) बलठण (205 दलघफू), शिरपुंजे (185दलघफू), कोथळा (182 दलघफू), पिंपळगाव खांड (500दलघफू) ही धरणे यापूर्बी भरली आहेत. कृष्णा खोर्‍यात येणारे येसरठाव(263.63 दलघफू) तुडूंब आहे. या धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी पुणे जिल्ह्यात जाते मुळा पाणलोट क्षेत्रांतील घोटी शिळवंडी (146 दलघफू) हे अखेरचे धरण होते. तेही आज ओव्हरफ्लो झाले.

प्रवरा व आढळा खोर्‍यातील वाकी(112 दलघफू) , टिटवी(303 दलघफू) , सांगवी , पाडोशी हे धरणही यापूर्वीच भरली आहेत. अकोले तालुक्यातील मुळा खोर्‍यातील सात, आढळा खोर्‍यातील दोन आणि प्रवरा खोर्‍यातील दोन अशी अकोले तालुक्यातील 11 धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत तर आता प्रतीक्षा आहे भंडारदरा, निळवंडे आणि आढळा हे मोठे धरणे भरण्याचे बाकी आहे.

मुळा खोर्‍यातील बेलापूर -ब्राम्हणवाडा गावासाठी वरदान ठरलेला बेलापूर (94.58 दलघफू)चा पाझर तलावात पाण्याची आवक सुरु झाली आहे तर कोतूळ, भोळेवाडी,बोरी या तीन गावांना पिण्याचे पाणी पुरवठा ज्या तलावातून होतो त्या बोरी (47.80 दलघफू)पाझर तलावात पाण्याची आवक सुरु झाली असून बोरी तलाव 30 टक्के भरला आहे. आढळा खोर्‍यातील पाडोशी(71.23दलघफू) व सांगवी धरण ओव्हरफ्लो झाल्याने देवठाण (1060 दलघफू) धरणातही आवक सुरु आहे .

मुळा नदी पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा काहीसा जोर कमी झाला. मुळा नदीचा कोतूळ येथून सकाळी 6 वाजता विसर्ग 4705 क्युसेक होता सायंकाळी सहा वाजता तो 5327 क्युसेक झाला मुळा धरणाकडे पाण्याची आवाक सुरूच असून मुळा धरणाचा साठा आज सायंकाळी 10570 दलघफू झाला. 16 जुलै 2016 रोजी मुळा धरण 50 टक्के भरले होते तर 16 जुलै2017 रोजी धरण 40 टक्के भरले त्या तुलनेत यावर्षी धरणात पाणीसाठा कमी आहे.

LEAVE A REPLY

*